Featured Posts
Recent Posts

शिक्षकांनी ज्ञानाच्या  गतिमान प्रवाहाशी संबंध जोडावा -प्राचार्य डॉ.रेखा महाजन

शिक्षकांकरिता प्रगत तंत्रस्नेही कार्यशाळा वर्धा, बालकांची अध्ययन प्रक्रिया सहज, सुलभ आणि आनंददायी होण्याकरिता शिक्षकांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या गतिमान प्रवाहाशी संबंध जोडावा असे प्रतीपादन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या डॉ. रेखा महाजन यांनी केले.

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, वर्धा च्या वतीने दि.२ ते ५ मे दरम्यान स्थानिक सभागृहात जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र भावना व्यक्त केल्या.

पुढे बोलतांना त्यांनी दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण शिक्षणातून बालकांचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नरत असावे असे विचार व्यक्त केले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी अंतर्गत आयोजित शिक्षकांच्या प्रगत तंत्रस्नेही कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून उद्बोधन करतांना प्राचार्य यांनी आपल्या ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. देवानंद सावरकर,मंजुषा औन्ढेकर, अधिव्याख्याता उर्मिला हाडेकर, सीमा पुसदकर यांची उपस्थिती होती.

कार्यशाळेदरम्यान शिक्षकांनी तयार केलेल्या वेबसाईटचे उद्घाटन प्राचार्या डॉ. रेखा महाजन व ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. किरण धांडे यांचे हस्ते करण्यात आले. सदर कार्यशाळे अंतर्गत फोटोशॉप, ऑफलाईन सॉफ्टवेअर निर्मिती,इंटरअक्टीव बोर्ड हाताळणे,वेबसाईट,ब्लॉगतयार करणे,विडीओ निर्मिती, युट्यूब चानल , एक्सलमध्ये शैक्षणिक साहित्य,क्यू आर कोड तयार करणे,गुगल फॉर्म विकसन,मित्रा ऐपचा प्रत्यक्ष वापर,या विषयासंदर्भाने आनंददायी व कृतियुक्त पद्धतीने आयसीटी विभागाचे शरद ढगे व स्वप्नील वैरागडे तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक जा. ब. विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. संजय नाखले,नागपूरचे अनुप लांबट व रुपेश नैताम, तंत्रस्नेही शिक्षक रुपेश लोहकरे, राजेंद्र गणवीर,सुनील जेवळे, किशोर गायधने, प्रमोद बोरकर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेकरिता विषय सहाय्यक, विषय साधनव्यक्ती शिक्षकांनी सहकार्य केले.


  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.