Featured Posts
Recent Posts

🏻‍तंत्रस्नेही शिक्षकांचा सन्मान🏻‍  DIECPD वर्धाच्या website चे उद्घाटन*


*दिनांक २९ जुलै २०१७*

*जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, वर्धा* येथे गुणवत्ता कक्ष बैठक घेण्यात आली. याप्रसंगी श्रीमती नयना गुंडे (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वर्धा), डॉ. रेखा महाजन ( प्राचार्या DIECPD, वर्धा), मा. डुरे सर (शिक्षणाधिकारी माध्य. जि.प. वर्धा) मा. किसनजी शेंडे (शिक्षणाधिकारी प्रा. जि.प. वर्धा), डॉ. किरण धांडे (विभाग प्रमुख आय. टी. विभाग DIECPD,वर्धा) डॉ. देवानंद सावरकर (जेष्ठ अधिव्याख्याता DIECPD,वर्धा), सौ.मंजुषा औंढेकर ( जेष्ठ अधिव्याख्याता DIECPD,वर्धा), सौ. सीमा पुसदकर (अधिव्याख्याता DIECPD,वर्धा) ,श्री. विनेश काकडे (समन्वयक जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था वर्धा) तसेच सर्व पंचायत समितीचे मा. गटशिक्षणाधीकारी उपस्थित होते. *तंत्रस्नेही शिक्षक कार्यसन्मान* वर्धा जिल्ह्यात 2700 शिक्षकांना तंत्रस्नेही करणे व शाळा डिजिटल करण्यास मदत केल्याबादल जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था वर्धा व 29 तंत्रस्नेही तज्ज्ञ मार्गदर्शक यांचा सन्मानचिन्ह देऊन गुण गौरव करण्यात आला. या *सन्मानचिन्हाची विशेष बाब म्हणजे यावर श्री. शैलेश नवाल ( मा. जिल्हाधिकारी वर्धा), श्रीमती नयना गुंडे (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वर्धा), डॉ. रेखा महाजन ( प्राचार्या DIECPD, वर्धा), मा. किसनजी शेंडे (शिक्षणाधिकारी प्रा. जि.प. वर्धा), डॉ. किरण धांडे (विभाग प्रमुख आय. टी. विभाग DIECPD,वर्धा) या सर्वांच्या शुभ संदेशांचे व्हिडिओ QR CODE च्या स्वरुपात देण्यात आलेले आहेत.*

*Website चे उद्घाटन*

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, वर्धा च्या अधिकृत वेबसाइटचे उद्घाटन *श्रीमती नयना गुंडे (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वर्धा)*, यांच्या हस्ते करण्यात आले. www.diecpdwardha.webs.com ही website शिक्षक, विद्यार्थी, पालक,यांच्यासाठी मदतकेंद्र म्हणून काम करणार आहे.

*आय.टी. विभाग कार्य* आय.टी. विभाग DIECPD, वर्धा ने आजपर्यंत केलेल्या कार्याचा सारांश याप्रमाणे सर्वांपुढे मांडण्यात आला 🔹तंत्रस्नेही शिक्षक नोंदणी1000 वरुन 3722 🔹तंत्रस्नेही प्रशिक्षण आयोजन 🏻‍तालुकास्तर शिक्षक दिनांक 28 फेब्रु. ते 31 मार्च 2017 🏻‍विषयसाधनव्यक्ती 30-31 मे 2017 🏻‍Advance Technosavy Training 1 2 ते 5 मे 2017 🏻‍केंद्रप्रमुख 7 ते 9 जून 2017 🏻‍Advance Technosavy Training 2 22 ते 24 जून 2017 🏻‍Apps creation workshop one day

🔹English E-Teach project 🔹MITRA App वापर वाढविण्यासाठी social media वरुन पाठपुरावा व मार्गदर्शन 🔹शाळांमधील डिजिटल साधने प्रभाविपणे वापराबाबत प्रत्यक्ष शाळेत जाऊन मार्गदर्शन 🔹Zoom meeting द्वारे शाळा Online जोडणे 🔹मागेल तिथे प्रशिक्षण 🔹शाळा डिजिटल करण्यासाठी मार्गदर्शन

*IT विभागाचे mission* 🔹100% शिक्षकांची तंत्रस्नेही नोंदणी व प्रशिक्षण 🔹100% डिजिटल शाळा 🔹Zoom meeting प्रणालीद्वारे पहिले100% online केंद्र तयार करुन पुढे तालुका व जिल्हा करणे 🔹तंत्रस्नेही शिक्षकांचा केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर मदतगट तयार करणे 🔹JBGV संस्थेच्या मदतीने डिजिटल शाळांची चळवळ पुढे नेणे 🔹Website द्वारा शाळेतील उपक्रम, नविन्यपूर्ण प्रयोग, विद्यार्थी-शिक्षक स्वनिर्मित साहित्य प्राप्त करुन प्रसिद्ध करणे व e साहित्य उपलब्ध करुन देणे हे आय.टी. विभाग DIECPD, वर्धाचे मिशन राहील हे सुध्दा संगितले.

🏻 *निरोप समारंभ*🏻 *डॉ. किरण धांडे (जेष्ठ अधिव्याख्याता)* डॉ. किरण धांडे (जेष्ठ अधिव्याख्याता) यांची DIECPD ,वर्धा येथून बदली झाल्यामुळे diecpd , वर्धा तर्फे त्यांचा निरोप समारंभ घेण्यात आला. डॉ. किरण धांडे ह्या आय टी विभाग diecpd, वर्धाच्या विभाग प्रमुख होत्या. अभ्यासू, विनम्र, उपक्रमशील, कवी, लेखक असे व्यक्तिमत्व होते. पुस्तक निर्मिती- फुले फुलताना, जाऊ आनंदाच्या गावं, संस्कारपर्व आदि. “डॉ. किरण धांडे ही माझी एक चांगली मैत्रीण आहे. वर्धा जिल्ह्याप्रमाणेच पुढेही कार्य करत रहा.” या शब्दात श्रीमती नयना गुंडे (मा. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा॰) यांनी डॉ. किरण धांडे यांचा गुण गौरव करण्यात आला. *मा. श्री. किसन शेंडे (शिक्षणाधिकारी प्राथमिक)* ३१ जुलै २०१७ रोजी मा. श्री. किसन शेंडे (शिक्षणाधिकारी प्राथमिक) हे निवृत्त होणार असल्यामुळे यांचा सुध्दा सत्कार DIECPD, वर्धा तर्फे करण्यात आला. मृदुभाषी, शांत, कार्यतत्पर, सर्वांना आपलेसे वाटणारे असे व्यक्तिमत्व मा. श्री. किसन शेंडे (शिक्षणाधिकारी प्राथमिक) यांचे होते. *पुस्तक अनावरण* *“निवडक शोधनिबंध”* या पुस्तकाचे अनावरण श्रीमती नयना गुंडे (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वर्धा) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. प्रस्तुत पुस्तकात महाराष्ट्रातील निवडक शोधनिबंधाचा संग्रह आहे. वर्धा जिल्ह्यातील सौ. प्रिया प्रशांतराव खरवडे व कु. दिपाली भापकर या शिक्षिकांचे शोधनिबंधांचा समावेश या पुस्तकात आहे. *“ओंजळीतील मोती”* या पुस्तकाचे अनावरण श्रीमती नयना गुंडे (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वर्धा) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. प्रस्तुत पुस्तकात WHATS APP वरुण संग्रहीत केलेल्या शिक्षकांच्या कवितांचा संग्रह आहे. प्रस्तुत पुस्तकाचे संकलन सौ. प्रणाली कोल्हे यांनी केले. 🏻 *समारोप* प्रस्तुत कार्यक्रमाला श्रीमती नयना गुंडे (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वर्धा), डॉ. रेखा महाजन ( प्राचार्या DIECPD, वर्धा), मा. डेरे सर (शिक्षणाधिकारी माध्य. जि.प. वर्धा) मा. किसनजी शेंडे (शिक्षणाधिकारी प्रा. जि.प. वर्धा), डॉ. किरण धांडे (विभाग प्रमुख आय. टी. विभाग DIECPD,वर्धा) डॉ. देवानंद सावरकर (जेष्ठ अधिव्याख्याता DIECPD,वर्धा), सौ. औंढेकर ( जेष्ठ अधिव्याख्याता DIECPD,वर्धा), सौ. सीमा पुसदकर (अधिव्याख्याता DIECPD,वर्धा) ,श्री. विनेश काकडे (समन्वयक जनकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था वर्धा) तसेच सर्व पंचायत समितीचे मा. गटशिक्षणाधीकारी, जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते. संचालन- मा. सौ. सीमा पुसदकर, आभार प्रदर्शन – मा. सौ. ओंढेकर प्रस्तुत कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण DIECPD वर्धा टीमचे सहकार्य लाभले.

आय.टी. विभाग DIECPD,वर्धा.


  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.