Featured Posts
Recent Posts

सक्षमीकरण कार्यशाळा - जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था वर्धा,

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था वर्धा, या संस्थेच्या आस्थापनेवर असलेल्या विषय साधनव्यक्ती, विशेष साधन व्यक्ती, विषय सहाय्यक यांना सधन करण्यासाठी दिनांक 25 ऑक्टोबर 2017 पासून सक्षमीकरण कार्यशाळा विविध विषयांवर आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेमध्ये दिनांक 25, 26व 27 ऑक्टोबर रोजी शाळा सिद्धी यासंदर्भात माननीय प्राचार्य श्रीमती रत्नमाला खडके यांनी सक्षमीकरण घडवून आणले.त्यानंतर त्या पुढील दोन दिवसात म्हणजेच दिनांक 30,31 ऑक्टोबर 2017 दरम्यान भाषा व गणित या विषयाचे सक्षमीकरण करून घेण्यासाठी भाषा भाषा विभाग आणि गणित विभाग यांचे विभाग प्रमुख आणि विेषय सहाय्यक यांनी दोन दिवस कार्यशाळा घेतली. ERAC तंत्राबाबत सक्षम करण्यासाठी दिनांक 1, 2 व 3 नोव्हेंबर रोजी सक्षमीकरण करण्यात आले. या सक्षमीकरण कार्यशाळेमुळे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था वर्धा च्या आस्थापनेवरील सर्व विषय साधनव्यक्ती, विशेष साधनव्यक्ती , विषय सहाय्यक जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना शैक्षणिक मदत करण्यासाठी सक्षम झाले असून दुसऱ्या सत्रापासून जिल्ह्यातील शिक्षकांना आवश्यक ती मदत पुरविली जाणार आहे. या कार्यशाळेदरम्यान संस्थेतील प्राचार्य,वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता यांची भूमिका मोलाची ठरली.


  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.