Featured Posts
Recent Posts

स्वप्नवत वाटणारी हावरे ले आउट येथील जि.प.सेवाग्रामची शाळा- एक शाळा भेट


दि.16/०1/18 ला हावरे ले आउट सेवाग्राम या शाळेला दहेगाव व नाचणगाव केंद्रातील आम्ही काही शिक्षकांनी भेट दिली.या शाळेतील शिक्षक *मा.प्रकाश कांबळे सर व सौ.सुनिता नगराळे मँडम* तसेच या शाळेतील विद्यार्थी यांचेशी संवाद साधला.शाळेचं रूप जितकं *देखणे....तितकेच मुलंसुद्धा *गुणवत्तेनं देखणी*....मनाला *मोहून* टाकणारी शाळा आज पहिल्यांदाच पाहायला मिळाली....आणि वाटले *'शाळा असावी तर अशी!'* येथिल शिक्षकांना काय विचारावे? एकही प्रश्न मुखातून निघू शकला नाही.फक्त आणि फक्त शाळा पाहावेसेच वाटे.येथिल दोन्ही शिक्षकांचं *कौतूक* करावं तेवढं कमीच..मा.प्रकाश कांबळे सर व मा.नगराळे मँडम यांचा शाळा व मुलं यांच्याबद्दल असलेला *जिव्हाळा* पाहून त्यांच्या कार्याला *दिलसे सँल्यूट* केल्याशिवाय राहवत नाही.......... शाळेतली प्रत्येक खोली साहित्याने भरलेली. *कार्यालय निटनेटके, *परसबाग*, *स्वच्छताग्रुह* सगळे कसे *टापटिप* .....हे सगळं बघतांना शिक्षकांनि कशी व किति मेहनत घेतली याचा अंदाजच बांधता येत नाही..............क्रिडांगणातुन शाळा न्याहाळत शाळेची *सेल्फी* घेण्याचा मोह मात्र आवरता आला नाही .. या शाळा भेटीत *शशिकांत थुल, शेखर भुजाडे,श्रिराम सहारे,धर्मेंद्र अंबादे,रविंद्र खेडकर,विशाल बन्सोड,क्रुष्णा झाडे,*व *राजेंद्र गणवीर* हे होते ...... शाळा भेटिने एक *सकारात्मक उर्जा* मात्र नक्कीच मिळाली .

- राजेंद्र गणवीर, (मु.अ. जि.प. उच्च प्राथ. शाळा. घोडेगाव,पं. स. देवळी, जि.प. वर्धा.)


  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.