Featured Posts
Recent Posts

नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा २०१८ Success Mantra कार्यशाळा - बिट वडनेर पं. स. हिंगणघाट.

शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत धारक विद्यार्थ्याचा % टक्का वाढावा, निकाल उंचवावा , स्पर्धा परीक्षाचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशासह नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा २०१८ Success Mantra कार्यशाळा आयोजित करण्यात आली या प्रयत्नांना उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल 30 विद्यार्थी व 35 शिक्षक हिंगणघाटच्या अगदी शेवटी असलेल्या ढिवरि पिपरी या शाळेत कार्यशाळेला उपस्थित होते. ज्यांनी या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असे श्री स्वप्नील मानकर , श्री मंगेश डाफ, श्री परमेश्वर नरवटे यांनी परीक्षा तंत्र मंत्र पध्दती यावर प्रभावी मार्गदर्शन करून सर्वाना मंत्रमुग्ध केले.

या प्रसंगी मा .गोविंदराव नांदेडे (माजी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र ) यांनी भ्रमणध्वनी द्वारे प्रेरणादायक संवाद साधून वातावरण चैतन्यमय केले मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद , शिक्षक - विद्यार्थी संयुक्त कार्यशाळा उत्कृष्ट आयोजन करणारे कु विजया ढगे , श्री अजय भांडे , हरिदास तळवेकर यांचे मनापासून आभार व अभिनंदन सुंदर परिपाठ स्वच्छ सुंदर शाळा , परसबाग आणि कार्यक्रमाची उत्कृष्ट तयारी करणारे श्री भगत मू. अ. व इतर सर्व शिक्षक ढिवरि यांचे सूध्daa खूप खूप अभिनंदन स्पर्धा परिक्षेचे प्रेरणास्थान मा श्री सर्जेराव पाटील ग. शि .अ .हिंगणघाट व श्री जाधव विस्तार अधिकारी आरोग्य यांनी आवर्जून भेट देऊन विद्यार्थी , शिक्षक यांना प्रशंसा कौतुकाची थाप व शुभेच्छा दिल्या*

- मंगेश देशपांडे शि .वि .अ हिंगणघाट, जि.प. वर्धा.


  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.