Featured Posts
Recent Posts

वर्धा जिल्हा दर्शन

🔖 *वर्धा जिल्हा* *देश :* भारत *राज्य :* महाराष्ट्र *प्रशासकीय विभाग :* नागपूर *मुख्यालय :* वर्धा *क्षेत्रफळ :* ६,३१० चौकिमी (२,४४० चौमैल) *लोकसंख्या :* १३,००,७७४ (भारतात ३७७ व्या क्रमांकावर) *पुरुष लोकसंख्या -* ६,६८,३८५, *महिला लोकसंख्या -* ६,३२,३८९, *शहरी लोकसंख्या -* ४,२३,३००, लोकसंख्या *वृद्धी दर* ४.८ % *घनता :* २१०/चौ.किमी (५३०/चौ मैल) *साक्षरता :* ७८.३७% (एकूण १०,१९,४५८ पैकी ५,५२,६१७ पुरुष व ४,६६,८४१ महिला) *लिंग गुणोत्तर :* ९४६/१,००० *प्रमुख मार्ग :* NH-७ *लोकसभा मतदार संघ :* वर्धा *विधानसभा (४) :* १.वर्धा, २.हिंगणघाट, ३.देवळी, ४.आर्वी पंचायत समिती मतदारसंघ : वर्धा, देवळी, सेलू, आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट, समुद्रपूर नगर परिषद : वर्धा, देवळी, पुलगाव,,सिंधी(रेल्वे), हिंगणघाट, आर्वी एकूण तालुके(८) : १.आर्वी, २.आष्टी, ३.सेलू, ४.समुद्रपूर, ५.कारंजा, ६.देवळी, ७.वर्धा, ८.हिंगणघाट *ग्राम पंचायती :* ५१२ *गावे :* १३८७ *पोलीस स्टेशन :* १७ *पोलीस आउट पोस्ट :* ८ *आर.टी.ओ.कोड :* MH-३२ 🔆 *भौगोलिक स्थान* : २०.१८° ते २१.२१° उत्तर अक्षांश आणि ७८.३३° ते ७९.१५° पूर्व रेखांश. ईशान्येस नागपूर जिल्हा, आग्नेयेस चंद्रपुर जिल्हा, नैऋत्येस यवतमाळ जिल्हा, वायव्येस अमरावती जिल्हा. 📓 *इतिहास* : वर्धा जिल्ह्यातील सिंधी(रेल्वे) येथे शहामृगाच्या अंड्याचे कवच आढळल्यामुळे भारतीय नैसर्गिक इतिहासात महत्वाचे स्थान आहे. मध्ययुगीन काळात गोंडांचे राजा बुलंद शाहा, भोसले रघुजी हे प्रमुख शासक होते. इसवी सन १८५० साली वर्धा(त्यावेळी नागपूरचा एक भाग) ब्रिटीशांच्या हाती पडला. त्यात सेन्ट्रल प्रोविअन्समध्ये वर्धाचा समावेश होता. वर्धा जिल्हा सन १८६२ पर्यंत नागपूर जिल्ह्याचा भाग होता. पुढे ते सुविधाजनक प्रशासकीय उद्देशासाठी वेगळे करण्यात आले आणि पुलगावजवळील कवठा जिल्हा हे मुख्यालय होते. १८६६ साली, जिल्ह्याचे मुख्यालय पालखवाडी गावात आले आणि सध्या वर्धा शहर तेथे विकसित करण्यात आले. 🏞 *हवामान* : तापमान - ९.४°से. ते ४६°से. पर्जन्यमान - १,०६२.८ मिमी 🗾 *प्रमुख नद्या* : वर्धा, वेणा, बोर, पोहरा, पंचधारा, यशोदा, बाकली, कर, धाम. 🌾 *मुख्य पिके* : सोयाबीन, कापूस, ज्वारी, गहू, दली, भुईमुग, चना ई. 🏭 *इतर उदयोग* : स्टील प्रोडक्ट्स, साखर कारखाने. 📖 *शैक्षणिक* : प्राथमिक शाळा - १,६९४, माध्यमिक शाळा - १५९. 🛣 *दळणवळणाच्या सोयी* : रस्ते वाहतूक(२७४ एस.टी.बसेस), रेल्वे वाहतूक (३९७ किमी) 💠 *पर्यटन* : बापू कुटी, वरदविनायक मंदिर केळझर, विश्वशांती स्तूप, गिताई मंदिर, गांधी ज्ञान मंदिर, सेवाग्राम, परमधाम आश्रम पवनार, बोर धारण सेलू, गारपीट, गिरड, ढगा जंगलक्षेत्र, मगन संग्रहालय, बाजाजावाडी, तुकडोजी महाराज आरती मंडळ आष्टी, सोनेगाव(आबाजी), तीर्थक्षेत्र कोटेश्वर, पोथरा धरण, मुरलीधर मंदिर पारधी, रुद्रसेन मंदिर पोह्णा, त्रिवेणी संगम मांड्गाव, महाकाली धरण, मल्हारी-मार्तंड मंदिर हिंगणघाट. 🤵🏻 *विशेष व्यक्ती* : बाबा आमटे, जमनालाल बजाज, ज्वाला गुट्टा, वैशाली म्हाडे, अभय बंग, राणी बंग, अब्दुल शफी 🙏🙏🙏 

#Wardha #वरधजलहदरशन #वरधजलहमहत

  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.