Featured Posts
Recent Posts

आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला 🌅✈ - प्राथ. शाळा कोल्हीची यशोभरारी*

तीन जिल्ह्याच्या टोकावर असलेले गाव कोल्ही आज आनंदात न्हाहून निघाले होते* *निमित्त होते कार्यसम्राट आमदार मा. समीरभाऊ भाऊ कुणावार यांच्या जनसत्काराचे ! आमदार गावात येतात गावकरी गोळा होतात आणि मागणी घालतात साहेब !* *एकदा आमची शाळा बघा.. आमची शाळा म्हणजे शिक्षणाची पंढरीच जणू ! इथे ज्ञान आहे, रचना आहे, उद्यान आहे, संस्कार आहे, तंत्रज्ञान आहे,* *जे, जे उत्तम उदात्त उन्नत.* *सर्व काही येथे आहे, स्वच्छ सुंदर निरामय आणि या शाळेला परीस स्पर्श झाला साहेबांनी शाळा दत्तक घेतली अवघी दूमदूमली पंढरी सग्गळ्ं गाव एकत्र आलं आणि त्यांच्या चिमुकल्यांनी कलाविष्कार सादर केला, कृतज्ञता व्यक्त केली. श्री. सुधीरभाऊ दिघे यांनी तात्काळ दोन टॅब्लेटची अपूर्व भेट शाळेला दिली, साहेबांनी दोन लाख पासष्ट हजार रुपयाचे साहित्य क्षणार्धात मंजूर केले तुम्ही जे मागाल ते देईन असे अभिवचन जन समूहाला दिले धन्य ते शिक्षक श्री.परमेश्वर नरवटे व कु. दीपाली भापकर ज्यांनी आज कोल्ही शाळा व गावाचे नाव रोशन केले रात्री 9 ते 11:30 पर्यंत चाललेल्या हा अपूर्व सोहळ्याचे साक्षीदार मला होता आले अवघा रंग एक झाला धन्य ते गाव, ती SMC, आणि ते शिक्षक*


  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.