Featured Posts
Recent Posts

*मा.नंदकुमार साहेब ,प्रधान सचिव शालेय शिक्षण यांचे मार्गदर्शन*

1) अध्ययन स्तर निश्चितीचा जिल्हानिहाय आढावा* मा.नंदकुमार साहेब प्रधान सचिव यांनी जिल्हा निहाय अध्ययन स्तर निश्चितीकरणा चा आढावा घेतला. त्यानुसार *वर्धा निश्चितीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात वाचन 78.3 , भागाकार 69.00 अशी* सद्यस्थिती असल्याचे दिसले.

*2) सर्व मूलं शिकू शकतात का ?* आदिवासी मुले शिकण्यात काही अडचण आहे का ? असा प्रश्न विचारून प्राचार्य पनवेल यांची भूमिका व मत जाणून घेतले. यावर *सर्व मूलं शिकू शकतात.शिकण्यास कोणतीही अडचण त्यांना येत नाही.* असे मत *श्री. सुभाष महाजन* प्राचार्य,DIECPD पनवेल यांनी व्यक्त केलं.

*3) मूल शिकण्यातल्या अडचणी कोणत्या ?* दिव्यांग मुले, आदिवासी मुले, भटक्या जमातीची मुले ,गरीब,दारिद्र्य रेषेखालील मुले अशी कारणे शिक्षक व आपली यंत्रणा देत असतात. _*ही कारणे नसून काम न करण्याचा सबबी आहेत.*_ *उदाहरणार्थ* : मी सकाळी नाश्ता केला म्हणून माझं पोट भरलं. पोट का भरलं ? मी नाश्ता केला म्हणून पोट भरलं. यावरून *शिक्षकांनी मुलांना शिकवलं नाही म्हणून मूलं शिकली नाही.* आणि *शिक्षकांना पर्यवेक्षीय यंत्रणेने जबाबदारी ने सांगितले नाही म्हणून शिक्षकांनी शिकवलं नाही.*

*4) सामाजिक,आर्थिक ,जातीय पार्श्वभूमी ही मूल शिकू न शिकण्याची खरी कारणे नाहीत.* कुसुमलताचा व्हिडिओ पहा.यावरून समजेल मूलं कशी शिकतात. व मुलांना शिकविण्यासाठी कुसुमलताला शिकविण्यासाठी तिची शिक्षिका काय करते हे समजून घेतले पाहिजे. सामाजिक, आर्थिक ही कारणे असल्यास आपणाला तसा समाज व परिस्थिती निर्माण करावी लागेल. तो पर्यंत आपण सारेच रिटायर्ड होऊ. *मूल न शिकण्याशी सामाजिक,धार्मिक, आर्थिक कारणांचा संबंध नाही.* मूल शिकले तर परिवर्तन घडेल. ही कारणे शिक्षकांनी तसेच यंत्रणेतील कोणत्याच व्यक्तीने या सबबी सांगू नयेत.

*5) DIECPD च्या सर्व विषय सहायक यांनी केंद्र निश्चित करावेत. व त्या केंद्रात वाचन व भागाकार क्षमतेत प्रगत करावेत.* 27 व 28 मार्च च्या सभेत दिलेल्या सूचनेनुसार सर्व विषय सहायक यांनी जिल्ह्यातील एका तालुक्यातील *एक चांगले केंद्र निवडून त्या केंद्रात 100% प्रगती करावी.* 30 सप्टेंबर 2018 पर्यंत किमान वाचन व भागाकार 100% मुलांना यायला हवे.

*6) संकलित च्या डेटा च्या बाबतीत हे आक्षेप आहेत.* *1) संकलित चा डेटा शिक्षक व यंत्रणा उपयोग करीत नाहीत.* *2) संकलित चा डेटा वास्तवदर्शी नाही.* *3) संकलित च्या माहितीत तफावत आढळते.

*7 National achivement survey व अध्ययन स्तर* नंदुरबार NAS मध्ये चांगला आहे. यवतमाळ मध्ये NAS वाईट दिसत आहे. अध्ययन स्तर मध्ये नंदुरबार वाईट दिसत आहे. असर चा अहवालात शिक्षण बाहेर चे चर्चा दिसत आहे. शिक्षण मधले असर ला बोलत होते. आता अध्ययन स्तर आपल्या यंत्रणेने केला आहे. अध्ययन स्तर मध्ये प्रगती केली तर NAS मध्ये यश मिळेल. मुलांना मूलभूत क्षमता यायलाच हवे. अध्ययन स्तर मध्ये आपल्याला काम करण्याची दिशा मिळत आहे. अध्ययन स्तर नुसार सोलापूर वाचनात 93 % व भागाकारात 91.81 टक्के व आहे. नंदुरबार वाचन 22.3 व भागाकारात 23.76 आहे. *त्यामुळे आपण कोणाकडे बोटं दाखविण्याचे कारण नाही. तर काम करण्याची गरज आहे.*

*8) DIECPD तील विभाग निहाय एक्स्पर्ट तयार करावेत.* आज DIECPD त पीएचडी धारक अधिकारी असून त्यांच्या विद्वत्तेचा उपयोग जिल्ह्यातील विद्यार्थी व शिक्षकांना व्हायला हवा. त्यांच्यातील उत्साही व हौशी अधिकाऱ्यां मधून प्राचार्या नी विभाग निहाय तज्ञ तयार करावेत. *1) अभ्यासक्रम विकसन* अभ्यासक्रम विकसन हा विभाग अत्यंत महत्वाचा आहे. या विभागाकडून काही जिल्ह्यातील गुणवत्तेसाठी काही तयार करता येते का ? याचा विचार करून तज्ञांची फळी तयार करावी. *2) मूल्यमापन* मूल्यमापन विभागाची जबाबदारी आहे. NAS, PSM , ASER व अध्ययन स्तर यातील जी तफावत दिसते यावरून आपल्याला मूल्यमापन करताच येत नाही असे दिसते. आपल्याला सक्षम मूल्यमापन विभाग तयार करावा लागेल. *3) प्रशिक्षण* परिणाम कारक प्रशिक्षण द्यायला पाहिजे. तसे प्रशिक्षक तयार करायला हवेत. *4) संशोधन मूल शिकते व्हावे यासाठी संशोधन विभाग तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र पणे कॉन्फरन्स घेऊ. DIECPD च्या प्राचार्या नी विभाग निहाय तज्ञ तयार करावेत.

*9) अति परिणाम कारक लोकांच्या सात सवयी* अति परिणाम कारक लोकांच्या सात सवयी नुसार तिसऱ्या प्रकारातील सवयीचे अनुपालन व्हायला हवे. आपण सोडवू शकू अशी समस्या (छोटा वर्तुळ) व आपण सोडवू न शकणारी समस्या (मोठा वर्तुळ) यापैकी आपणास आपण सोडवू शकणाऱ्या वर्तुळावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे.

*10) बाह्य मूल्यमापन केले आहे का ?* अध्ययन स्तर निश्चित केल्यानंतर कोणी बाह्य मूल्यमापन केले आहे का ? यावर जालना जिल्ह्याने बाह्य मूल्यमापन करण्याची तयारी व नियोजन केले असल्याचे सांगितले. तर उर्वरित जिल्ह्यांनी सुध्दा बाह्य मूल्यमापन शक्य झाल्यास करावे. अध्ययन स्तर निश्चित करताना केंद्रप्रमुख व CRG सदस्यांची अदलाबदल करावी. *11) 100% वर्ग,शाळा, केंद्र ,बीट, तालुका करावा* राज्यात अनेक शिक्षक चांगले काम करीत आहेत. ज्या शिक्षकाचा वर्ग 100 प्रगत असल्यास किंवा अनुक्रमे शाळा,केंद्र बीट तालुका 100% प्रगत होण्यासाठी काम करावे. तसे माहितीचे विश्लेषण करावे. रत्नागिरी तील सांगवे व चंद्रपूर मधील ताडाळी केंद्र 100% प्रगत असल्याचे नमूद केले.

*12) DIECPD ची कार्यसंस्कृती विकसित करावी* Diecpd तील व्यक्ती 1 दिवस कार्यशाळा किंवा मीटिंग करीता कार्यालय सोडून गेली तर अर्धा तास किंवा प्रशिक्षणास गेली असेल तर 2 तास मीटिंग घ्यावी. व कार्यशाळा अथवा प्रशिक्षणात काय झाले त्याचा आढावा प्राचार्य यांनी समजून घ्यावे.

*13) SSA, RMSA व TE योजनेचे विलीनीकरण* सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक प्रशिक्षण या योजनेचे *सबको शिक्षा अच्छी शिक्षा* या योजनेत विलीनीकरण केंद्र सरकारने केली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेस प्राध्यान्य दिले आहे.

*14) सरल व SDS चा data 24 एप्रिल पर्यंत भरावा* Sds चा data व सरल चा data भरण्यासाठी विषय साधनव्यक्ती, data entry optarte यांची मदत. केंद्रनिहाय एक्सेल file देऊन शिक्षकांच्या मदतीने हा डेटा भरावा.

*15) रूम to रीड* मुलाना वाचते करावे व त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचनीय पुस्तके असतील असे ग्रंथालय उभारावे. त्यासाठी SSA किंवा CSR याचा उपयोग करावा. विद्यार्थ्यांत वाचन संस्कृती विकसित करावी.

*16 रोज शिकत राहावे वाचत राहावे.* कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त ही वेळ आपल्या कामास द्यावा. आपण रोज शिकत राहावे. कुसुमलता सारखे व्हिडिओ पहावयास हवे. त्यातून आपण शिकत राहू.

*17) ..... तरच Diecpd ला शाळेत स्वीकारतील.?* शाळेत DIECPD ला शिक्षक का स्वीकारत नाहीत ? जर शिक्षकांना देण्यासाठी आपणाकडे नवीन काहीच नसेल तर शिक्षक स्वीकारणार नाहीत. यासाठी आपण शिकायला हवे. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या मराठी विभागाच्या विभाग प्रमुख *सुजाता लोहकरे मॅडम यांनी* या गोष्टी केल्या. 1) परिणामकारक प्रशिक्षण घेतलं. 2) Online course शिकत आहेत. 3) काही मुले दत्तक घेतले. व त्यांना वाचते केले.

*18) शिक्षकाचे pedagogy तंत्र सुधारावे.* DIECPD च्या व्यक्तींनी स्वतः शिकावे व शिक्षकाला प्रशिक्षित करावे. त्याचे अध्यापन तंत्र सुधारावे. यासाठी स्वतःची प्रगल्भता वाढवावी लागेल.

*19Eldp sldp आर्थिक हिशोब* ELDP व SLDP प्रशिक्षण केंद्रांनी केलेल्या खर्चाचा हिशेब 10 एप्रिल पर्यंत सादर करण्यात यावा. अशा सूचना मा. नेहा बेलसरे, उपसंचालक महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे यांनी केल्या.

*धन्यवाद*


  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.